अभ्यासादरम्यान काय होते?
या अभ्यास चाचण्यांसाठी 29 भेटी आणि रुग्णालयातील 2 मुक्कामांसह 72 आठवड्यांपर्यंत (17 महिन्यांपर्यंत) चालेल.

*अभ्यासाच्या समाप्तीला, तुमच्या मुलाकडे/मुलीकडे दीर्घकालीन पाठ-पुरावा अभ्यासामध्ये नावनोंदणी करण्याचा पर्याय असेल, ज्यामध्ये तुमच्या मुलाच्या/मुलीच्या आरोग्यावर आणखी 15 वर्षे लक्ष ठेवले जाईल.

छाननी
अभ्यास सुरू करण्यापूर्वी, तुम्ही माहितीपूर्ण संमती प्रपत्र वाचून व त्यावर सही करून तुमच्या मुलाला/मुलीला सहभागी होण्यासाठी तुमची परवानगी देणे गरजेचे असेल. त्यांच्या वयावर अवलंबून, काही मुले/मुली सुद्धा माहितीपूर्ण अनुमती प्रपत्रावर सही करून परवानगी देऊ शकतील. नंतर अभ्यास तुमच्या मुलासाठी/मुलीसाठी योग्य असल्याची खात्री करण्यासाठी अभ्यास डॉक्टर माहिती गोळा करतील आणि चाचण्या करतील.
उपचार आणि पाठ-पुरावा
या अभ्यासामध्ये 2 पाठ-पुरावा कालावधींसह 2 उपचार कालावधी आहेत:



OAV101 कसे दिले जाते?
OAV101 हे एक-वेळचे इंजेक्शन म्हणून पाठीच्या कण्याच्या खालच्या भागात दिले जाते (इंट्राथेकल इंजेक्शन).
माझ्या मुलाच्या/मुलीच्या कोणत्या प्रकारच्या चाचण्या होतील?
अभ्यासादरम्यान तुमच्या मुलाच्या/मुलीच्या केल्या जातील अशा काही चाचण्यांमध्ये यांचा समावेश होतो:
रक्त चाचणी
श्वसन चाचणी
हृदयाची कृती (इलेक्ट्रोकार्डिओग्राम)
हृदयाचे प्रतिमांकन (इकोकार्डिओग्राम)
मानसिक आरोग्य तपासणी*
गतीशीलता कार्य चाचण्या
मज्जासंस्थेची तपासणी
शारीरिक तपासणी
पाठीच्या कण्याचा (स्पायनल) टॅप
मूत्र चाचणी
एक्स-रे (छाती, पाठीचा कणा)
*मानसिक आरोग्य तपासणी 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लागू होऊ शकणार नाही.
या अभ्यासादरम्यान घेतल्या जातील अशा चाचण्यांपैकी फक्त काही चाचण्या आहेत. तुमच्या मुलाच्या/मुलीच्या प्रत्येक भेटीत सर्व चाचण्या होणार नाहीत. अधिक माहितीसाठी अभ्यास डॉक्टरांशी बोला.
काळजीवाहकांना देखील त्यांच्या मुलाच्या/मुलीच्या एसएमएचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दल एक प्रश्नावली भरायला सांगितले जाईल.